साई संस्थानचे लॉकडाउनमध्ये झाले शंभर कोटी रूपये खर्च 

One hundred crore rupees spent in lockdown of Sai Sansthan
One hundred crore rupees spent in lockdown of Sai Sansthan


shr2632 
शिर्डी ः एका बाजूला कोरोनाचा कहर सुरू, दुस-या बाजुला साईमंदिर बंद आहे. दानपेट्या रिकाम्या असताना, गेल्या पाच महिन्यात सुमारे शंभर कोटी रूपये खर्च झाला. भाविकांच्या कृपेने जेमतेम वीस कोटी रूपये उत्पन्न मिळाले. तिरूपतीच्या धर्तीवर राज्य सरकारने साईमंदिर खुले करण्याची परवानगी दिली तर बरे होईल. शहर आणि साईसंस्थानचे अर्थचक्र थोडे तरी हलू लागेल. अशी साईसंस्थान प्रशासनाची मानसिकता आणि ग्रामस्थांची अपेक्षा आहे. 

आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थानात एरवी दररोज सत्तर हजार भाविक दर्शन घ्यायचे. दोन महिन्यांपासून हे मंदिर खुले करण्यात आले. सध्या दररोज नऊ ते दहा हजार भाविक दर्शन घेतात. लॉकडाऊनपूर्वी दररोज तीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळायचे. ते आता ऐंशी लाख रूपयांवर आले आहे. मात्र, या दोन महिन्यांच्या कालावधित खबरदारी घेऊनही तेथील चौदा हजार कर्मचा-यांपैकी सातशे जण कोविडने बाधित झाले. दोघांचे मृत्यू झाला. पाचशे बरे झाले. सध्या दोनशे कर्मचारी उपचार घेत आहेत. 

याचा अर्थ असा की साईमंदिर खुले झाले, तर कोविड संसर्ग रोखणे सर्वाधिक महत्वाचे काम असेल. साई संस्थानकडे सहा हजार कर्मचारी आहेत. त्यातील काहीजण आजूबाजूच्या तालुक्यातून येतात. तिकडे तिरूपती देवस्थान या संस्थानच्या मालकीच्या डोंगरावर आहे. त्यामुळे संसर्ग व्यवस्थापन करणे त्यांच्या दृष्टीने तुलनेत सोपे आहे. शिर्डी शहरात सध्या पन्नास कोविड बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. आजवरचा बाधितांचा आकडा दोनशे एकोणचाळीस आहे. आजूबाजूच्या जवळपास प्रत्येक गावात रूग्ण आहेत. या सर्व बाबी साई संस्थान आणि नगरपंचायतीला विचारात घ्याव्या लागतील. 

साई संस्थानचे यापूर्वीचे कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे व सध्याचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविडच्या पार्श्वभुमीवर भाविकांचे दर्शन व निवास व्यवस्थेचे कागदावर नियोजन केले आहे. आता मंदिर खुले होण्यापूर्वी कोविड संसर्ग रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा उभी करण्याचे नियोजन करावे लागेल. साईमंदिर खुले झाले तर बसून असलेल्या कर्मचा-यांपैकी काहींना काम देता येईल. 


गेल्या दोन महिन्यांपासून तिरूपती मंदिर आम्ही दर्शनासाठी खुले केले. कोविड व्यवस्थापन व फिजीकल डिस्टन्स या दोन महत्वाच्या बाबींसाठी आम्ही कशी व्यवस्था केली. हे जाणून घेण्यासाठी साईसंस्थानने आपले प्रतिनिधी पाठविले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांना सर्व माहिती देऊ. विशेष खबरदारी घेऊनही आमचे कर्मचारी कोविडने बाधित होतात. त्यांच्यासाठी आम्ही उपचार व्यवस्था उभी केली आहे. सध्या दहा हजार भाविक दररोज दर्शनासाठी येतात. परिस्थिती पाहून ही संख्या आम्ही वाढवित आहोत. 
- शिवकुमार, विश्वस्त, तिरूपती बालाजी देवस्थान, आंध्रप्रदेश 
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com