‘ईसकाळ’च्या वृत्तानंतर ‘त्या’ मायलेकींसाठी फुटला मायेचा पाझर

Sarpanch help to Rakhmai Panthave and Tulsabai Mengal from Pimpalgaon
Sarpanch help to Rakhmai Panthave and Tulsabai Mengal from Pimpalgaon

अकोले (अहमदनगर) : रखमाबाई पंथवे व तुळसाबाई मेंगाळ यांच्याबाबत ‘ईसकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या महिला आपल्या गावात आहेत का? असा तपास सुरु झाला. त्यांचा शोध लागला आणि मग पिंपळगाव नाकवींदा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी त्या डोंगरावर जाऊन त्या महिलांची विचारपूस केली. त्यांची भेट घेतली व त्यांना धान्य व जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला.

तुळसाबाई तुम्ही जरी कोंभाळणे ग्रामपंचायत हद्दीत असाल  तरी जी मदत लागेल ती देण्याचे आमचे प्रयत्न राहतील. त्यापैकी एका महिलेस पिंपळगाव येथे इंदिरा आवास योजनेतून घरकुल देण्यात आले असून दुसरा हप्ता देण्यात आला व नंतर ती योजना बंद पडली. त्यासाठी प्रयत्न करून तिचे घरकुल पूर्ण करू, असेही सरपंच व सदस्यांनी सांगितले. त्यामुळे या महिलांना जणू आपणाला भेटण्यासाठी देवदूत आल्याचा भास झाला.

निळवंडे जलशयाच्या मागील बाजूस असलेल्या पिंपळगाव नाकविंद शिवारात गावकुसाबाहेर एका डोंगरावर तुळसाबाई मेंगाळ, रखमाबाई पथवे या दोन विधवा मायलेकी महिला आपल्या चिल्या पिल्याना घेऊन गवताच्या झोपडीत जीवन कंठीत आहेत. ना घर, ना सुविधा पण प्रपंचाचा गाडा हाकत गेली. अनेक वर्षे या जंगलात आपली  अर्धवट संसाराची गाडगी मडकी घेऊन प्रवास करीत आहे. 

उन वारा, पाऊस याचा सामना करत नी दोन चार शेळ्या सांभाळून शेताच्या एका तुकड्यावर या दोन महिला एकमेकीला साथ करत गवताच्या झोपडीत राहत आहे. तुळसा बाई मेंगळं ह्या कोंभळणे गावात राहत होत्या. मात्र शेती करण्यसाठी त्या पिंपळगाव शिवारात आल्या ग्रामपंचायत पिंपळगाव शिवारात त्या असल्या तरी त्यांचे रेशनकार्ड हे त्या गावचे. मात्र वृत्त प्रसिध्द होताच सरपंच सुमन आढळ, उपसरपंच सुनीता बगनर, ग्रामसेवक गौतम जानकर, सदस्य उज्वला लगड, सामाजिक कार्यकर्ते माधव बोऱ्हाडे, वाळीबा पाटील लगड, देवराम बगनर, सुभाष बगनर व ग्रामस्थांनी या महिलांना धान्य जीवनावश्यक वस्तू देऊन त्यंचे सांत्वन करुन आधार दिला. 

यावेळी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडले. प्रसंगी सरपंच सुमनताई आढळ यांनी त्या मायलेकींना आधार देऊन तुम्हाला जी अडचण येईल ती दूर निश्चित करू. आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग यांचेकडे आपल्यांना ज्या शासकीय मदती लागेल त्यसाठी पाठपुरावा करण्याचे ठोस आश्वासन दिले. 

यापूर्वी रडत खडत जगणाऱ्या या महिला पिंपळगाव नाकविंदा ग्रामस्थांचा मायेचा हात पाठीवर पडल्याने उद्याची येणारी पहाट आपल्यासाठी चांगली असेल असा विश्वास त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने मिळाला. 

ग्राम पंचायत पिंपळगाव नाकविंदा यांनी कोव्हीड १९ साठी गावातून १० हजार रुपयाचा निधी दिला असून या गरीब कुटुंबाला त्यांनी दत्तकच घेतले आहे व त्यांना भरीव मदत दिली जाईल तर काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहे. तुळसाबाई कोंभालने येथील असून त्यांची शेती नापीक आहे. रेशन कार्ड हरवले म्हणून मिळत नाही. आधार कार्ड तर नाहीच शिवाय त्यांची मुलगी त्यांच्यासोबत असून तिला घरकुलाचे एकच हापता मिळाला असल्याचे टी सांगते व योजना बंद झाल्याचे अधिकारी सांगतात.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com