

Vidyadhan Yojana: Major Boost for Girls’ Education in India
sakal
शिर्डी: दहावीच्या निकालासोबत उच्च शिक्षणासाठी मुलींच्या हातावर तब्बल एक लाख रुपयांची रक्कम ठेवण्याची अनोखा उपक्रम वाकडी येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून उद्या (ता. १२) तब्बल सतरा मुलींच्या हाती प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश सोपविले जाणार आहेत. विशेष म्हणजे बालवाडी ते दहावीपर्यंत दरवर्षी मुलींच्या वार्षिक फी मधून काही रक्कम ठेव स्वरूपात ठेऊन हे एक लाख रुपये उच्च शिक्षणासाठी त्यांच्या हाती दिले जाणार आहेत. स्वामी विवेकानंद विद्याधन योजना या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना अन्य शाळांना मार्गदर्शक ठरणारी आहे.