
चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. (15 जानेवारी) रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.
राहुरी : तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींमध्ये 150 प्रभागांतून 418 सदस्य निवडून द्यायचे आहेत. या ग्रामपंचायतींच्या अंतीम मतदार यादीत पुरुष 49,498 व महिला 44,709 असे एकूण 94,207 मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 167 मतदान केंद्र आहेत. आज (बुधवारी) अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी अशी एकही उमेदवारी अर्ज आला नाही, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.
तहसीलदार शेख म्हणाले, की "राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारhttps://Panchayatelection.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी पोहोच व हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
23 ते 30 डिसेंबर दरम्यान (25 ते 27 दरम्यान सार्वजनिक सुट्ट्या वगळून) राहुरी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. (31 डिसेंबर) रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.
चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. (15 जानेवारी) रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. (18 जानेवारी) रोजी मतदान होईल, असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले. अहमदनगर