

165 Missing in a Year: Parner Police Face Major Challenge
sakal
-मार्तंड बुचुडे
पारनेर : पारनेर तालुक्यात जानेवारी ते आजअखेरपर्यंत तब्बल १६५ स्त्री-पुरुष बेपत्ता झाले आहेत. सरासरी दोन दिवसांत एक व्यक्ती बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणांपैकी १३० जणांचा शोध लागला असला, तरी अद्याप ३५ स्त्री-पुरुष बेपत्ता असून, त्यांचा शोध घेणे हे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरले आहे. ही बाब गंभीर असून प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.