esakal | श्रीरामपूर तालुक्यात बाधितांचा आकडा हजारापार
sakal

बोलून बातमी शोधा

One thousand corona patients in Shrirampur taluka

श्रीरामपूर तालुक्यात बाधितांचा आकडा हजारापार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीरामपूर ः शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तालुक्‍यात आज 229 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्‍यातील कोरोना ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजार 122 वर पोहचली आहे. 200 जणांना घरी सोडण्यात आले.

शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 48 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील विविध ठिकाणच्या खासगी कोविड रुग्णालयांत सध्या 423 रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर डॉ. आंबेडकर वसतिगृहासह आदिवासी मुलांचे व मुलींच्या वसतिगृहात 168 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

तालुक्‍यातील काही गंभीर रुग्णांवर नगरसह पुणे व नाशिक येथील विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेतील दोन हजार 680 रुग्ण सरकारीसह खासगी कोविड रुग्णालयांतून उपचार घेवून बरे होवून घरी परतले. शहर परिसरात 336, ग्रामीण भागात 729 रुग्ण कोरोना ऍक्‍टिव आहेत.

शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आज दिवसभरात 240 नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात आज 110 जणांची आरटीपीसीआर व आठ जणांची रॅपिड कोविड टेस्ट करण्यात आली. रॅपिड तपासणीचे आठही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

बातमीदार - गौरव साळुंके

loading image
go to top