कांद्याचे लिलाव पुन्हा झाले सुरू, शेतकऱ्यांची परवड संपणार

कांदा
कांदाई सकाळ

पारनेर ः पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कांदा खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरू राहणार आहेत. यापुढे फक्त बुधवारी व शुक्रवारीच कांदा खरेदी केला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी केल्या आहेत. (Onion auction resumes in Parner taluka)

कांदा
शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल तर साधा अर्ज करील काम तमाम

बाजार समितीमध्ये आठवड्यातील बुधवारी व शुक्रवारी कांदाखरेदी-विक्रीचे व्यवहार सकाळी सात ते अकरा या वेळेत करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी लिलावाच्या आदल्या दिवशी, म्हणजे मंगळवारी व गुरुवारी बाजार समितीत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील काळात गरज भासल्यास लिलावाचे दिवस वाढविण्यात येणार आहेत, असेही पानसरे यांनी म्हटले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करून कांदाखरेदी- विक्री व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.

नगर जिल्ह्यात नेप्ती उपबाजार (नगर), घोडेगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी ही कांद्याची मोठी मार्केट आहेत. नगर आणि पारनेर तालुक्यातील कांदा लिलावासाठी परजिल्ह्यातील व्यापारी येतात. मात्र, मार्केट बंद असल्याने व्यापारी येणे बंद झाले आहेत. त्याचा परिणाम भाववाढीवर होत होता. शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत होते. आता कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची नुकसान होणार नाही.(Onion auction resumes in Parner taluka)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com