कांदा लागवडीसाठी मजुरांना एकराला द्यावे लागत आहेत नऊ ते...

मार्तंड बुचुडे 
Sunday, 6 September 2020

चांगला पाऊस झाल्याने व खरीपाची काही पीके अती पाऊसामुळे वाया गेली होती.

पारनेर (अहमदनगर) : यंदा चांगला पाऊस झाल्याने व खरीपाची काही पीके अती पाऊसामुळे वाया गेली होती. परिणामी शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे. मात्र कांदा लागवडीस मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजूर मिळविण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे. तसेच थेट आळेफाटा येथे जाऊन मजूर आणावे लागत आहेत. शिवाय त्यांना एकरी नऊ ते 10 हजार रूपये लागवडीसाठी द्यावे लागत असल्याने आता शेतकरी जेरीस आले आहेत.

सध्या कांद्याचे बाजारभाव कमी असले तरी कांदा लागवड मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या वर्षी तालुक्यात सुमारे 25 हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. गतवर्षी बाजारभाव चांगला मिळाला होता. याचा विचार करून शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लावड करत आहे. कांदा लगावडीसाठी मजूर मात्र मिळेनासे झाले आहेत. यापूर्वी मरठवाडा, विदर्भातील मजूरही तालुक्यात होते. तेही कोरोनाच्या काळात गावाकडे गेल्याने तसेच स्थानिक मजूर मिळत नसल्याने अनेकांना आता थेट आळेफाटा व त्या परीसरात जाऊन आदिवासी विभागातील मजूरांना आणावे लागत आहे. त्यांचा दरही खूप आहे. साधरणपणे एकरी नऊ ते 10 हजार रूपये त्यांना द्यावे लागत आहेत. नाहीतर स्थानिक मिळविण्यासाठी गावोगाव फिरून एक एक मजूर गोळा करावा लागत आहे. त्यांनाही किमान तीनशे रूपयेप्रमाणे रोजंदारी द्यावी लागत आहे. 

मजूरांप्रमाणे मध्यातंरी अती पाऊस झाल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले होते. अनेकांची रोपे खराब झाली. त्यामुळे कांदा रोपांचीही कमतरता भासल्याने रोपांची मागमी वाढल्याने त्याचेही दर खूपच वाढले आहेत. कांदा बियाणेही नऊ ते 10 हजार रूपये पायलीप्रामणे घ्यावे लागत आहेत. मात्र आता बियाणे टाकली तर रोपे लावण्यास खूप ऊशीराने येतील त्यामुळे तयार रोपे घेण्यावर शेतक-यांचा जोर आहे. त्यामुळे कांदा रोपे व बियाणांच्या टंचाईप्रमाणेच मजूरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

गेली काही वर्षापासून कांद्यास बाजारभावही सातत्याने चांगला राहीला आहे. अधून मधून कांद्यास बाजारभाव कमी झाले तरी शेतकरी अनेक या पीकाला सरावला आहे. सध्या पारनेर, सुपे, हंगे, भाळवणी व टाकळी ढोकेश्वर कान्हूरपठार या कोरडवाहू पट्यात पाऊसावर व कोरड्यात अता कांदा लागवड सुरू आहे. तसेच कुकडी कालव्याखालील वडझिरे, निघोज, वडगाव, जवळ, लोणीमावळा, आळकुटी, वडझीरे, देवीभोयरे, राळेगण थेरपाळ या परीसरातही मोठ्या प्रमाणात कांदा सुरू आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion cultivation increased in Parner taluka