
राहुरी : वांबोरी उपबाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव झाले. कांद्याच्या २३२१ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० रुपयांचा भाव मिळाला. राहुरी तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याला कमीत कमी २०० व जास्तीत जास्त १९०० रुपयांचा भाव मिळाला.