
सोनई: शनिशिंगणापूरमध्ये ऑनलाईन पूजा व तेल अर्पण करण्यात घोटाळा झाला असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कामगार विभाग अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. याबाबत सोमवारी (ता.९) बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.