गावोगावी पेटल्या 'शेकोट्या'..!

सुनील गर्जे  
Wednesday, 18 November 2020

नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात १५ अंश सेल्सिअसर्यंत घटले आहे. त्यामुळे थंडी, ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला असा त्रासाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

नेवासे (अहमदनगर) : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात लक्षणीय घट होत असून, ऑक्टोबरमधील किमान तापमान १९-२० अंश सेल्सिअस  होते. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात १५ अंश सेल्सिअसर्यंत घटले आहे. त्यामुळे थंडी, ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला असा त्रासाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोना रुगणांची संख्या कमी झालेली असताना व्हायरल इन्फेक्शनच्या तक्रारी उदभवत आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये मात्र रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. ताप, थंडी, अंगदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाची भिती ऑक्टोबर महिन्यापासून काहीशी कमी झाली आहे. मात्र, हिवाळा सुरु झाल्याने व्हायरल इन्फेक्शनच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. छोट्या खासगी दवाखान्यांमध्ये दररोज ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे अशा तक्रारी घेऊन येत आहेत.

वातावरणातील बदलामुळे फ्लूचे प्रमाण वाढले आहे. उन्हामध्ये फिरू नये, थंड पेय पिऊ नये, थंडी, तापाचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे.

आजार अंगावर काढू नका

कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. तरीही सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नये. परस्पर मेडिकलमधून गोळया घेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यातून आपण आपल्याच आरोग्याशी खेळत आहोत, हे विसरुन चालणार नाही. अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

नेवासेचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी म्हणाले, मास्कच्या वापरामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण दर कमी झाले आहे. तसेच प्रसारचाही वेग मंदावलेला आहे. असे असूनही धोका टळलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करुन नये, लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Since the onset of cold weather in early November village fires are being set up