
-सतीश वैजापूरकर
शिर्डी: माळेवाडीच्या मातीने मला जे बळ दिलं, आणि माझ्या शिक्षकांनी जे मूल्यं दिली, त्याचं चीज रणभूमीवर झालं. आज माझ्या छातीवर शौर्य पदक आहे...पण त्या मागे असंख्य अनाम वीरांचं बळ आहे, आणि एका मराठी सैनिकाचा साधा निर्धार आहे. काल शौर्यपदक जाहीर झाले अन् मला वाटले मराठी माणूस आणि पराक्रमाचे नाते जवळचे आहे. आपण निर्धार करतो, त्याचवेळी विजय मिळवतो, असा मराठ्यांचा इतिहास आहे, असे वायुसेनेचे शौर्य पदक विजेते देवेंद्र औताडे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले.