शरद पवार यांच्याकडे भाजपच्या पिचडांच्या विरोधकांची तक्रार

शांताराम काळे
Sunday, 27 December 2020

अगस्ती कारखान्याने दिलेल्या माहितीचे कागदपत्रे व असलेले कर्जाबाबत निवेदन दिले. यावेळी राज्यमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. 

अकोले (अहमदनगर) : अगस्ती सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमिततेबाबत माजी मंत्री मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळ यांचे विरोधात विरोधक राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, अशोक भांगरे, बी. जे. देशमुख, दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, सुरेश गडाख, विनय सावंत तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी पुणे येथील साखर संकुलातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यालयात भेट घेऊन अगस्ती कारखान्याने दिलेल्या माहितीचे कागदपत्रे व असलेले कर्जाबाबत निवेदन दिले. यावेळी राज्यमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. 

आमदार लहामटे, अशोक भांगरे यांनी आम्ही अगस्ती कारखान्यात सत्तांतर घडवू इच्छितो. तुमचे आशीर्वाद द्या तर दशरथ सावंत व बी. जे. देशमुख यांनी कोणत्याही आर्थिक निकषात न बस्तान अगस्तील कर्ज कसे उपलब्ध झाले, असा सवाल राज्यमंत्री पाटील याना विचारला. यावेळी खासदार शरद पवार यांनी चर्चा करून अगोदर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, असा सल्ला दिला. तसेच सर्वाना विश्वासात घ्या. कर्ज दिले ते जास्त आहे. मात्र त्याच्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opponents of BJP pitches complain to Sharad Pawar