पोषण आहाराचे मसाले खराब झाल्यावर वाटपाचे आदेश 

Order of distribution after spoilage of nutritious food
Order of distribution after spoilage of nutritious food
Updated on

श्रीरामपूर ः कोरोनामुळे प्रारंभी लॉकडाउन लागु करण्यात आला आणि शाळा, महाविद्यालये बंद झाली. त्यानंतर लॉकडाउन मध्ये बाजारपेठासह सर्व व्यवहार ठप्प झाले होते. एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत असतांना दुसरीकडे उपचार यंत्रणा वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला. लाॅकडाउन शिथील झाल्यानंतरही खबरदारी म्हणुन शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शालेय पोषण आहाराचे साहित्या विद्यार्थ्यांना वाटपाच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या. त्यानंतर शाळेतील तांदुळ आणि मुगदाळ, हरभरे असे अनधान्य सोशल डिस्टस्निगचे पालन करुन विद्यार्थ्यांना वाटप केले.

खिचडीसाठी वापरण्यात येणारे मसालेपदार्थ व खाद्यतेल शाळेत पडुन राहिले. गेल्या चार महिन्यापासुन शाळेत पडुन असलेले मसाले पदार्थासह खाद्यतेल खराब आता झाले आहेत. सदर बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतेच काढुन मसालेपदार्थाचे गरजु विद्यार्थांना वाटपाचे सुचना शालेय व्यवस्थापन समितीला केल्या आहेत. पोषण आहारासाठी फेब्रुवारी ते मार्च कालावधीसाठी पुरवठा केलेल्या धान्य मालापैकी तेल, कांदा लसुन मसाले, हळद, जिरे, मोहरी व मीठ आणि मिर्ची पुड असे विविध मसालेपदार्थ शालेय स्तरावर शिल्लक असुन ते गरजू विद्यार्थ्यांना वाटप करावे असे पत्रात नमुद आहे.

शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची नुकतीच यासंदर्भात बैठक पार पडली. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुट्ट्यासाठी निश्चित केलेल्या प्रमाणात तांदुळ, मुगडाळ व हरभरा अशा धान्य वस्तूंची मागणी पुरवठेदाराकडे नोंदवून शाळास्तरावर विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप करावे.

शालेयस्तरावर शिल्लक असलेले खाद्य तेल, कांदा लसुन मसाले, हळद, जिरे, मोहरी व मीठ आणि मिर्ची पुड असे मसालेपदार्थ शालेय व्यवस्थापन समितीने वाटप करावेत. वाटपावेळी शिल्लक असलेल्या वस्तुंपैकी खराब झालेल्या वस्तु अथवा मुदतबाहय झालेले पदार्थ वाटप करु नये. खान्यास योग्य असलेल्या वस्तुंचे वाटप करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचनांचे पालन करावे. असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. 

मसाले, खाद्यतेल वाटपाबाबत उशिरा जाग 
लाॅकडाउन काळात शाळेतील तांदुळ आणि मुगदाळ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. परंतू खिचडीसाठी लागणारे मसालेपदार्थ व खाद्यतेल शेंगदाणे शाळेत पडुन असल्याने ते खराब झाले आहे. अनेक शाळेतील मसाले तसेच खाद्यतेल मुदतबाह्य झाल्याने ते खराब झाले आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ शाळेतच खराब झाल्यानंतर वाटपासाठी शालेय शिक्षण विभागाला उशिरा जाग आली आहे. 
संपादन ः अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com