esakal | उस्मानाबाद- बीडकारांना मंत्री शंकरराव गडाखांचा साधेपणा भावला
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Beed citizens felt the simplicity of Minister Shankarrao Gadakh

अतिशय मृदु,संवेदनशील, अन प्रेमळ स्वाभावाचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून जनतेत ओळख असलेले नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सहज साधेपणाचा अनुभव अनेकांनी अनुभवलेला आहे.

उस्मानाबाद- बीडकारांना मंत्री शंकरराव गडाखांचा साधेपणा भावला

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : अतिशय मृदु,संवेदनशील, अन प्रेमळ स्वाभावाचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून जनतेत ओळख असलेले नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सहज साधेपणाचा अनुभव अनेकांनी अनुभवलेला आहे.

त्यांच्या या साधेपणामुळे तालुक्यातील पहिल्या फळीच्या नेत्यापासून, शेतात राबणार्‍या मजुर असो की गल्लीतील एखादा तरुण सर्वांनाच ते आपल्या जवळचे वाटतात. असाच एक अनुभव शनिवार (ता. 15) रोजी स्वातंत्र्य दिनी उस्मानाबाद- बीड जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या अनेक नागरिकांनी अनुभवला. त्यांच्या या साधेपणामुळे तर अनेकजण आश्चर्येचकीतच झाले तर अनेकांनी कौतुकही केले.

शिवसेनेचे मंत्री गडाख हे पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद जिल्हाचा दोन दिवसांचा दौरा आटोपून शनिवार सकाळी नगरला येत असतांना त्यांनी आपल्या वाहान चालकाला उस्मानाबाद- बीड महामार्गावर एका बंद असलेल्या ढाब्यासमोर गाडी थांबण्याचे सांगितले.

मंत्री महोदयांचे वाहान तेथे थांबले.'बंद ढाब्यावर कशाला? या विचाराने बरोबर असणारे काहीकाळ विचारात पडले. दरम्यान मंत्री गडाख वाहानातून आपला जेवणाचा डब्बा घेवून उतरले यांनी थेट धब्याच्या शेडमध्ये असलेल्या 'बाजे'वरच भारतीय बैठक मारून जेवायला बसले. यावेळी त्यांच्या बरोबर असणार्‍यांनीही आपले जेवणाचे डबे काढत तेथेच जेवण केले.

दरम्यान राज्याचा एक कॅबिनेट मंत्री चक्क बंद ढाब्यावर थांबून डब्यात जेवण करत आहे. मंत्र्याचा हा साधेपणा पाहून परिसरातील अनेक नागरिक आश्चर्यचकित झाले. त्यातच ही बातमी सर्वत्र पसरली. दरम्यान मंत्री गडाख जेवण करत असतांनाचे फोटो उस्मानाबाद, बीड, नगर जिल्ह्यात सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने मंत्री गडाख यांचा हा साधेपणा अनेकांना भावाला.
मंत्री झाल्यावर पोलिसांना इतर खूप काम असते म्हणून सरकारने दिलेली स्वत:ची पोलिस सुरक्षा स्वत: पोलिस पोलिस विभागाला विनंतीकरून सुरक्षा नाकारणारे मंत्री शंकरराव गडाख यांचा हा साधेपणा या आधीही राज्यातील जनतेने अनुभवला आहे.

मंत्री गडाखांच्या साधेपणाचे असेही अनुभव
मंत्री शंकरराव गडाख यांचे साधेपणाचे अनुभव अनेकांनी अनुभवलेले आहे. त्यात ते सोनई येथील चौकात बसून सर्वसामान्यांबरोबर चहा घेणे असो, किंवा घोडेगावच्या जनावरांच्या बाजारात शेतकर्‍यांबरोबर चहा टपरीच्या बाकावर बसून समस्यांवर चर्चा करत चहा घेणे असो. मंत्री झाल्यावरही ते दुचाकीवरून शेतकर्‍यांच्या वस्तीवर जावून गाठीभेटी घेणे. तसेच अनेक धार्मिक, विवाहसह सार्वजनिक कार्येक्रमांसह सर्वांच्याच सुख- दुखा:त ते सहभागी असतात. नेवासे तालुक्यासाह नगर जिल्ह्यात त्यांच्या साधेपणाचाची नेहमीच चर्चा असते. आणि तो साधेपणा सर्वांनाच भावतोही.
 

माझ्या छोट्या ढाब्यावर कधी मंत्री जेवण्यासाठी थांबतील असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ढाब्यासमोरून अनेक आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी यांच्या वाहानांचे ताफे येतांना-जातांना पाहिले. मात्र कॅबिनेट मंत्री असूनही इतके साधेपणा प्रथमच पाहिला. ते येथे जेवणासाठी थांबले हे माझे भाग्यच समजतो
परवेज चौधरी, चारभाई ढाबा, बीड-उस्मानाबाद महामार्ग
 

एखादा राज्याचा कॅबिनेट मंत्र्याचा साधेपणा प्रथमच पहात आहे. कोणताही बडेजावपणा न करता मंत्र्याला ढाब्यावर सर्वसामान्यासारखे जेवण करतांना पाहिल्यावर आश्चर्येच वाटले, आणि अभिमानही वाटला.
- संतोष राऊत, उस्मानाबाद 

संपादन : अशोक मुरुमकर