esakal | ओसवाल बंधू संस्थेकडून रुग्णालयासाठी ३८ लाखांचा देणगी
sakal

बोलून बातमी शोधा

ahemednagar

ओसवाल बंधू संस्थेकडून रुग्णालयासाठी ३८ लाखांची देणगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : ओसवाल बंधू समाज पुणेकडून अहमदनगर येथील आनंदऋषीजी रुग्णालयातील न्युरॉलॉजी (मेंदुविकार) विभागातील अद्ययावत मशिनरीसाठी ३८ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. त्या मशिनरींचे लोकार्पण ओसवाल बंधू समाजचे अध्यक्ष वालचंद संचेती आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले.

आमदार संग्राम जगताप, उद्योजक प्रेमराज बोथरा, सचिव जवाहरलाल बोथरा, खजिनदार नेमीचंद कर्नावट, हरकचंद गुंदेचा, सुभाष तालेरा, फुलचंद बाठिया, प्रमोद बाफना, कुंदन कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश लोढा व डॉ. काळे उपस्थित होते. संचेती म्हणाले, ‘राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या रुग्णालयाचा नावलैकीक देशभरात पोचला आहे. या सेवाकार्यात सहभागी होता येणे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अद्यायावत वैद्यकीय सुविधा व मशिनरी रुग्णालयात उपलब्ध असल्याने उच्चदर्जाची सेवा या ठिकाणी मिळणार आहे.’

loading image
go to top