

Students queue up in large numbers for scholarship distribution at Ahilyanagar district office.
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आज (ता.२२) शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेसाठी पाचवीच्या ३७ हजार ९५१, तर आठवीच्या २० हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील पाचवीच्या पहिल्या पेपरला ६५८, दुसऱ्या पेपरला ६६२, तर आठवीच्या पहिल्या पेपरला ४२६ आणि दुसऱ्या पेपरला ४३०, असे २ हजार १७६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.