esakal | कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी विसापूरमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Overflow water of Kukdi project released in Visapur medium project

सर्वदूर होणाऱ्या चांगल्या पावसाने कुकडी प्रकल्पातही पाण्याची चांगली आवक सुरू आहे.

कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी विसापूरमध्ये

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : सर्वदूर होणाऱ्या चांगल्या पावसाने कुकडी प्रकल्पातही पाण्याची चांगली आवक सुरू आहे. येडगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर आता ते पाणी कालव्यातून विसापूर मध्यम प्रकल्पात सुरू केले आहे.

अधिकाऱ्यानी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लो पाण्याचा लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या सुरु असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माजी आमदार पाचपुते म्हणाले, कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सध्या विसापूर तलावात सोडले आहे. शेतकऱ्यांनी शेततळी भरुन घ्यावीत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

येडगाव व वडज ओव्हरफ्लो झाले आहे. डिंबे धरणही लवकरच ओव्हरफ्लो होईल. त्याचा फायदा कुकडी खालील शेतकऱ्यांसह घोड धरणालाही होणार आहे. घोड धरणाची सद्यस्थिती चांगली असून घोड सुद्धा लवकर ओव्हरफ्लो होईल असा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त केला. 

संपादन : अशोक मुरुमकर