esakal | राशीनच्या तरूणांनी रूग्णांना दिला प्राणवायू
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन सिलेंडर

राशीनच्या तरूणांनी रूग्णांना दिला प्राणवायू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राशीन : सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच ऑक्‍सिजनवर आली आहे. स्थिती गंभीर असताना राशीन (ता. कर्जत) येथील मॉर्निंग वॉक टीममधील तरुणांनी प्रशासनाला ऑक्‍सिजनच्या शंभर सिलिंडरची मदत दिली.

मॉर्निंग वॉक टीमचे सदस्य पांडुरंग भंडारे, संदीप सागडे, मनोज बोरा, संतोष काशीद, मुख्याध्यापक राजेंद्र नष्टे, सोयब काझी, ऍड. हरिश्‍चंद्र राऊत, संकेत पाटील, तात्यासाहेब माने, राहुल राजेभोसले, सुरेश सायकर, विनोद राऊत, मिलिंद रेणुके, माऊली कदम, बिभीषण जंजिरे, भास्कर मोढळे, मोईन शेख, अब्बास शेख, मकरंद राऊत, महेश गवळी, दादा जाधव, पप्पू भिताडे, संदीप राऊत, विकी पवळ, भाऊसाहेब पंडित, आप्पा राऊत, महेश गवळी, सुनील गोसावी, अमोल पंडित आदींनी एक लाख रुपयांचा निधी संकलित करून त्यातून शंभर ऑक्‍सिजन सिलिंडर प्रशासनाकडे सुपूर्द केले.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. नष्टे म्हणाल्या, ""मॉर्निंग वॉक टीमने दिलेल्या मदतीने अनेक कोरोना रुग्णांना जीवदान मिळणार आहे. आपत्तीच्या काळात प्रशासनाला मदत करण्यास जेव्हा लोक पुढे येतात, तेव्हा ती लोकचळवळ होते.''

पोलिस निरीक्षक यादव म्हणाले, की मॉर्निंग वॉक टीमने उचललेले हे पाऊल गौरवास्पद आहे. प्रास्ताविक विनोद राऊत यांनी केले. आभार सुरेश सायकर यांनी मानले.

बातमीदार - दत्ता उकिरडे

loading image