नेवासा फाटा ग्रामीण रूग्णालयात अॉक्सीजन निर्मिती प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

नेवासा फाटा ग्रामीण रूग्णालयात अॉक्सीजननिर्मिती प्रकल्प

नेवासे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनचा प्रश्‍न गंभीर बनला होता. तालुका ऑक्‍सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने नेवासे फाटा (Nevasa fata) येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने सुमारे दीड कोटी रुपयांचा ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प साकारत आहे.

(Oxygen generation project to be set up at Nevasa Rural Hospital)

हेही वाचा: कोरोनावर मात करणं सहज शक्य; डॉक्टरांनी सांगितला उपाय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्‍यात ऑक्‍सिजनचा प्रश्‍न ऐरणीवर आला. या आठवड्यात जिल्ह्यातील ऑक्‍सिजन पुरवठा काहीसा सुरळीत झाला असला, तरी ऑक्‍सिजनसाठी प्रशासनाला मोठया प्रमाणावर धावपळ करावी लागली. ही बाब लक्षात घेत गडाख यांनी मागील महिन्यात नेवासे तालुक्‍यातील चिलेखनवाडी येथील ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पाची अधिकाऱ्यांसह जाऊन पाहणी केली. तसेच तेथील विविध अडचणी सोडविल्या होत्या.

अधिकाऱ्यांशी बैठक घेत नेवासे येथे ऑक्‍सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला आता यश आले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यावर तालुक्‍यातील आरोग्य विभागाला संजवनी मिळणार आहे.

नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेला ऑक्‍सिजन प्रकल्प हा तमिळनाडूमधील कोइंबतूरची फॅरेडे ओझोन ही कंपनी बनविणार असून, सुमारे दीड कोटीचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे दीडशे सिलिंडर ऑक्‍सिजन तयार होणार आहे. दरम्यान, कोरोना संकट काळात ऑक्‍सिजन पुरवठ्याचा प्रश्‍न गडाखांच्या प्रयत्नाने सुटल्याने तालुक्‍यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भविष्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा नसेल

तालुक्‍यात शनिशिंगणापूर भक्तनिवास येथे 250, तर भेंडे बुद्रुक येथे 300 बेडचे व खासगी दोन, असे चार कोविड केअर सेंटर आहेत. तसेच दोन शासकीय व दहा खासगी, असे 12 कोविड हेल्थ केअर सेंटर आहेत. नेवासे फाटा येथील ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यावर भविष्यात तालुक्‍याला ऑक्‍सिजनचा (oxygen project) तुटवडा भासणार नाही.

"सध्याच्या परिस्थितीतीवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, यादृष्टीने माझे प्रयत्न आहेत. नेवासे फाटा येथे होणार ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने कार्यान्वित व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

- शंकरराव गडाख, मृद व जलसंधारणमंत्री

(Oxygen generation project to be set up at Nevasa Rural Hospital)

Web Title: Oxygen Generation Project To Be Set Up At Nevasa Rural

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
go to top