पद्मानगर, भिंगार झाले कन्टेन्मेंट झोन 

padma nagar
padma nagar

नगर - सावेडी उपनगरातील पद्मानगरमध्ये सात आणि भिंगार शहरात तीन कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने पद्मानगर आणि अहमदनगर छावणी परिषदेने भिंगार शहरातील लोहार गल्ली, मुळे गल्ली व गवळीवाडा कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे त्याजवळील परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. सावेडी उपनगर व भिंगारमध्ये पहिल्यांदाच कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. 

शहरातील कापडबाजारात असलेल्या एका वस्त्रदालनातील कामगारांना कोरोनाची लागण झाली. या कामगारांचे नातेवाईक पद्मानगरमध्ये राहतात. त्यांचा संपर्क कोरोनाबाधित रुग्णांशी आल्याने एकाच कुटुंबातील व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली. दोन दिवसांपासून पद्मानगरमध्ये कोरोनाबाधित आढळून येत असल्याने आज हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. या भागाला दुपारी चारच्या सुमारास महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी भेट देऊन पाहणी केली. माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, शहर अभियंता सुरेश इथापे आदी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाकडून पद्मानगर परिसर पत्रे लावून सील करण्यात आला आहे. या भागाला उद्यापासून महापालिका प्रशासनाकडून सशुल्क जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यात येणार आहेत. दोन्ही भाग 14 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट झोन राहतील. 

कन्टेन्मेंट झोन 
पद्मानगर : जुना पिंपळगाव रस्ता, साई एक्‍लेव्ह अपार्टमेंटमधील मोबाईल शॉपी, पाईपलाईन हडकोमधील अंतर्गत रस्ता, जय सीताराम सुपर मार्केट, नूतन मराठी शाळा, गिरीधन अपार्टमेंट शेजारी व्यवहारे यांचे घर, पद्मानगरमधील खुल्या जागेची उत्तर हद्द, सौंदर्या क्रिएशन ते मोबाईल शॉपी. 
भिंगार : लोहार गल्ली, मुळे गल्ली, गवळीवाडा. 

बफर झोन 
पद्मानगरजवळील जुन्या पिंपळगाव रस्त्याच्या पूर्वेकडील वसाहती - जय तुळजाभवानी नगर, ज्ञानेश्‍वरनगर, दत्तनगर, एकवीरा चौक, पाईपलाईन हडको, वसाहतीचा दक्षिण भाग, पाईपलाईन रस्ता, यशोदानगर वसाहत, यशोदानगरच्या उत्तरेकडील खुली जागा, गावडे मळा, शिवचिदंबर मंदिर परिसर, साई इंग्लिश मेडियम स्कूल ते तुळजाभवानी मंदिर. 
भिंगार - उर्वरित भिंगार व सदर बाजार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com