पद्मानगर कॅन्टोन्मेंट झोन नावालाच; आओ जाओ घर तुम्हारा! 

padmanagar
padmanagar
Updated on

नगर : सावेडी उपनगरातील पद्मानगरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी पद्मानगर कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. मात्र महापालिका व पोलिस प्रशासनाच्या चुकांमुळे हा कॅन्टोन्मेंट झोन नावा पुरताच उरला आहे. या भागातील नागरिक संपूर्ण नगर शहरात विना अटकाव फिरत आहेत. त्यामुळे नगरकरांनाच पद्मानगरपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील पद्मानगर भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आले तरी या भागातील नागरिकांना व जिल्हा प्रशासनाला याचे काही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. महापालिकेने हा परिसर जरी कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेला असला तरी या भागाला महापालिकेकडून पत्रे लावून सील करण्यात आलेले नाही. पद्मानगरच्या काही भागांत केवळ बांबू आडवे लावून परिसर सील झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

पद्मानगर कॅन्टोन्मेंट झोनच्या प्रवेशद्वारात पोलिस कर्मचारी तैनात नसल्याचा फायदा घेत नागरिक पद्मानगरमधून सहज बाहेर येत आहेत. हे नागरिक शहरातील विविध भागांत फिरत आहेत. शहरात कोरोना बाधितांचा आकडा वेगात वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून पद्मानगर भागाला गांभिर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. हे नागरिक असेच फिरत राहिल्यास जवळील निर्मलनगर, पाईपलाईन रस्ता आदी भागांत कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. जिल्हा प्रशासनाकडून योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्याने सावेडी उपनगरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. 

जनतेच्या पैशातून महापालिका कॅन्टोन्मेंट झोन करण्यासाठी लाखो रुपयांची बिले काढते. या कॅन्टोमेंट झोन करण्याचा उद्देश साध्य होत नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कॅन्टोमेंट झोनमधून नागरिक बाहेर पडत असल्याने सावेडी उपनगरातील नागरिकांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने हा परिसर योग्य प्रकारे पत्रे लावून सील करावा तसेच पोलिस प्रशासनाने या परिसरातील नागरिक बाहेर येणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. 
- निखील वारे, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com