सोनईतील उबेद शेख यांची चित्र कलाकृती दुबईच्या कला प्रदर्शनात

विनायक दरंदले 
Wednesday, 7 April 2021

नवीदिल्ली येथील कलाकार फाऊंडेशनच्या वतीने चित्र मागविण्यात आले होते. सोनई येथील उबेद शेखने बंजारा समाज जीवनावर काढलेल्या चित्र कलाकृतीची दुबई येथील प्रदर्शनात निवड झाली आहे.

सोनई (अहमदनगर) : सोनई येथील उबेद सलीम शेख याने काढलेल्या चित्र कलाकृतीची निवड दुबई येथील प्रदर्शनात झाली आहे. भारतातून निवड झालेल्या  दहा चित्रकारात त्याची निवड झाली आहे. 
 
नवीदिल्ली येथील कलाकार फाऊंडेशनच्या वतीने चित्र मागविण्यात आले होते. सोनई येथील उबेद शेखने बंजारा समाज जीवनावर काढलेल्या चित्र कलाकृतीची दुबई येथील प्रदर्शनात निवड झाली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे ७ ते ११ एप्रिल दरम्यान जागतिक चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

उबेद याने पाठविलेल्या 'थ्री फेस' नावाच्या कलाकृतीस जागतिक बहुमान मिळाला आहे. त्याचे कलाशिक्षण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात झाले असून  बदलापूर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित चित्र प्रदर्शनात त्याचे चित्र ठेवण्यात आले आहे. त्यास कलाशिक्षक कोल्हटकर व भावना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल त्याचे परिसरातून अभिनंदन होत आहे. शनिश्वर विद्या मंदिरचे सेवानिवृत्त प्राचार्य सलीम शेख यांचे ते चिरंजीव आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The painting by Ubed Salim Sheikh from Sonai has been selected for exhibition in Dubai