esakal | पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास

बोलून बातमी शोधा

क्राईम
पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास
sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत ः तालुक्यातील कुळधरण येथे पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या बाबत पोलीस पाटील समीर पाटील यांनी पोलीस स्थानकात खबर दिली. मयत पत्नीचे नाव योगिता राहुल गजरमल ( वय-२६) आहे. तिच्या पतीचे नाव राहुल दिलीप गजरमल (वय : ३०) आहे.

ही घटना काल रात्री घडल्याची शक्यता आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने कुळधरण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. मृत योगीताच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार आहेत. तर घरापासून दोनशे फुटावर लिंबाच्या झाडाला राहुलने गळफास घेतला.

या बाबत वृत्त असे की, राहुल याने कुर्‍हाडीने पत्नी योगिताच्या डोक्यात व मानेवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नवऱ्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस भाऊसाहेब माळशिकारे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन यांनी घटनास्थळी देत पाहणी केली.