३० फुटी रस्ता बनला पार्किंग झोन, अपघाताचे प्रमाण वाढले

शांताराम काळे
Tuesday, 17 November 2020

राजूर येथील कोल्हार घोटी रस्त्यावर चक्क पार्किंग झोन असल्यागत जीप, ट्रक, मोटरसायकल, ट्रक्टर बिनधास्तपने लावून गप्पाचा फड रंगला जात आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील राजूर येथील कोल्हार घोटी रस्त्यावर चक्क पार्किंग झोन असल्यागत जीप, ट्रक, मोटरसायकल, ट्रक्टर बिनधास्तपने लावून गप्पाचा फड रंगला जात आहे. मोठा रस्ता होऊनही वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात ही वाढले आहेत. 

बारी ते संगमनेर हा २२५ कोटीचा रस्ता सुरू असून या रस्त्यावर वाहन तल करून वाहतुकीला अडचण निर्माण करण्याचे काम खाजगी वाहतूकदार करत असल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिस खाते व सार्वजनिक बांधकाम खाते रस्त्याच्या अडवणूक व वाहनतळ रोखण्यास असमर्थ दिसत आहे. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. त्यात रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार हळू हळू रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळत आहे.

सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत मोठी ट्रॅफिक कोल्हार घोटी रस्त्यावरील पेट्रोल पंप ते पिचड बंगलापर्यंत पूर्ण गर्दी असते त्यामुळे अपघात होऊन एका मोटर सायकल चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर मोठ्या प्रमाणात मोटर सायकल व चारचाकी वाहने रस्त्यावर उभे करून जणू पार्किंग समजून बिनधास्त पने लोक गाड्या उभा करत असल्याने वाहतूक कोलमडली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking on 30 feet road in Akole taluka