पारनेरमध्ये ८८ ग्रामपंचायती गेल्या प्रशासकांच्या ताब्यात

मार्तंड बुचुडे
Saturday, 12 September 2020

काही सामाजिक संघटना, सरपंच परिषदेने तर थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यामुळे राजकीय पदाधिकारी- कार्यकर्त्यांऐवजी शासनाने अधिकाऱ्यांच्या प्रशासकपदी नियुक्‍त्या केल्या आहेत. 

पारनेर ः तालुक्‍यातील मुदत संपणाऱ्या तब्बल 88 ग्रामपंचायतीवर अखेर प्रशासकांच्या नियुक्‍त्या झाल्या. प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्ताराधिकारी, त्या दर्जाच्या शाखा अभियंत्यांच्या नियुक्‍त्या जाहीर झाल्याने अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

राजकीय पाठिंब्याच्या जोरावर का होईना मागच्या दाराने आपण गावात सरपंच होऊ, अशी अनेकांची मनोकामना अपुरी राहिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्यातील सरपंच परिषद, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच सरकारी आदेशाप्रमाणे प्रशासक नियुक्तीस विरोध केला होता.

हेही वाचा - महिला केंद्रात येताच नर्स बसली लपून

काही सामाजिक संघटना, सरपंच परिषदेने तर थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यामुळे राजकीय पदाधिकारी- कार्यकर्त्यांऐवजी शासनाने अधिकाऱ्यांच्या प्रशासकपदी नियुक्‍त्या केल्या आहेत. 

प्रशासकपदी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी व कृषी विस्ताराधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या झाल्या आहेत. तालुक्‍यातील आठ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टअखेर संपली, तर उर्वरित 80 ग्रामपंचायतींची मुदती सप्टेंबरअखेर संपत आहेत.

ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल तेथे संबंधितांनी ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून कारभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे. या प्रशासकांना मूळचा पदभार सांभाळून प्रशासकपदाचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Parner, 88 gram panchayats are under the control of past administrators