Parner : धोकादायक वर्गखोल्या सील, झेडपी प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही

Sakal Impat: या खोल्यांचा निर्लेखनाचा प्रस्तावही शिक्षण विभागास चार महिन्यांपूर्वीच पाठविला आहे.
Parner : धोकादायक वर्गखोल्या सील, झेडपी प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही
Updated on

मार्तंड बुचुडे

Latest Marathwada News: तालुक्यातील अस्तगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. या शाळेची व्यथा ‘धोकादायक इमारतीत भरते शाळा’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दखल घेतली. मंगळवारी (ता. ३१) गटशिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी शाळेला भेट देत दोन वर्ग खोल्या सील केल्या.

अस्तगाव येथील जिल्हा परीषदेच्या शाळाखोल्यांची दुरवस्था झाली आहे. येथील शाळेची भिंत कोसळू लागली आहे. शाळेच्या भिंतीतून पाऊस आल्यावर पाणी थेट वर्गात येते. वर्ग खोल्यांवरील पत्रेही गळत आहेत. शिक्षण विभाग कशाची वाट पहात आहे? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.

Parner : धोकादायक वर्गखोल्या सील, झेडपी प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही
Marathwada News: टेलरने वेळेवर ब्लाऊज दिला नाही, महिला ग्राहक मंचात; बसला मोठा दंड

हे वृत्त ‘सकाळ‘ने प्रकाशित केले. त्यानंतर मंगळवारी (ता. ३१) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने गटशिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी अस्तगाव शाळेला तातडीने भेट दिली. राणे यांनी केंद्रप्रमुख भिवसेन पवार, शाळा समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत धोकादायक दोन खोल्या सीलबंद केल्या. यावेळी शाळा समिती अध्यक्ष अनमोल काळे, राजू गाढवे, प्रमोद काळे, बाळासाहेब काळे, सुनील खोसे आदी उपस्थित होते.

Parner : धोकादायक वर्गखोल्या सील, झेडपी प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही
Marathwada: शेततळ्यापासून घ्या खबरदारी, १७ वर्षीय मुलाचा झाला दुर्दैवी मृत्यू

६३ वर्षांपूर्वीची इमारत

तालुक्यातील अस्तगाव शेवटचे गाव आहे. पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, १६० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची इमारत ६३ वर्षांपूर्वी १९६० मध्ये बांधण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन शाखा अभियंते प्रशांत ध्रुपद यांनी २०२० साली इमारत मुलांना बसण्यासाठी धोकादायक आहे, असा शेरा दिला आहे. या खोल्यांचा निर्लेखनाचा प्रस्तावही शिक्षण विभागास चार महिन्यांपूर्वीच पाठविला आहे.

वर्गखोल्या धोकादायक असल्याने मुले शाळेत कशी पाठवावित, त्यांची पर्यायी सोय करावी, असे आम्ही प्रशासनास सांगितले. ‘तुम्ही निर्लेखन प्रस्ताव पाठविताना मुलांची बसण्याची सोय करतो, असे लेखी दिले आहे, अशी आठवण गटशिक्षणाधिकारी राणे यांनी ग्रामस्थांना करून दिली.

- राजू गाढवे, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

Parner : धोकादायक वर्गखोल्या सील, झेडपी प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही
Inscription In Marathwada : इतिहासाच्या पाऊलखुणा : जटवाडा येथील देवनागरीतील शिलालेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com