esakal | रब्बी हंगाम पीक स्पर्धेत पारनेर अग्रेसर
sakal

बोलून बातमी शोधा

rabbi season crop

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत पारनेर अग्रेसर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर (जि. नगर) : गतवर्षी राज्यात रब्बी पीक हंगामातील गहू व ज्वारीची पीक स्पर्धा घेण्यात आली. तीत पारनेरने बाजी मारली असून, नाशिक विभागात गहू पिकात बाळासाहेब मेहेत्रे यांचा तृतीय, तर जिल्हास्तरावर ज्वारी पीकउत्पादनात भानुदास थोरात यांनी प्रथम क्रमांक मिळविला. (Parner leads in the rabbi season crop competition)

गतवर्षी राज्यात रब्बी हंगामातील गहू व ज्वारी पिकांच्या उत्पादनाची स्पर्धा घेण्यात आली. त्यात गहू पिकाच्या उत्पादनात विभागीय पातळीवर दत्तू कडलग (तिफनवाडी, ता. खेड) यांनी प्रथम, दिलीप नाईकरे (कमान, ता. खेड) यांनी द्वितीय, तर पारनेर तालुक्यातील बाळासाहेब मेहेत्रे यांनी हेक्टरी ७१.९४ क्विंटल उत्पादन घेत तृतीय क्रमांक मिळविला.

जिल्हास्तरावर ज्वारी पीकउत्पादनात प्रथम क्रमांक भानुदास थोरात (४६.८७ क्विंटल प्रतिहेक्टर), द्वितीय क्रमांक पांडुरंग कर्डिले (४५.३२ क्विंटल प्रतिहेक्टर) व तृतीय क्रमांक बबन पागिरे (३९.७३ क्विंटल प्रतिहेक्टर) यांनी मिळविला. तालुकास्तरीय ज्वारीउत्पादन स्पर्धेत प्रल्हाद राजदेव (३४.१० क्विंटल प्रतिहेक्टर) यांनी प्रथम, अनिकेत देशमाने (३२.२८ क्विंटल प्रतिहेक्टर) यांनी द्वितीय, संतोष राजदेव (३१.८५ क्विंटल प्रतिहेक्टर) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गहूउत्पादनात सुधाकर दिवटे (१५.१० क्विंटल प्रतिहेक्टर), संतोष शेंडकर (५३.६० क्विंटल प्रतिहेक्टर), सीताबाई येवले (५२.१० क्विंटल प्रतिहेक्टर) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.

हेही वाचा: 'कोरोना आहे, लांबच थांबा…'; चक्क कोरोनाची भीती दाखवत दरोडा

या वर्षीही घेणार स्पर्धा

याही वर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मूग पिकासाठी ३१ जुलै, सोयाबीन, बाजरी, मका, तूर पिकासाठी ३१ ऑगस्ट, ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी केले आहे.

(Parner leads in the rabbi season crop competition)

हेही वाचा: नगर जिह्यातील लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा

loading image
go to top