
पारनेर : नगरसेवकाच्या चुलत भावाची हत्या
पारनेर : पारनेरचे नगरसेवक भूषण शेलार यांचे चुलत भाऊ सिद्धेश संजय शेलार (वय २०) यांची शिक्रापूर येथे विकी खराडे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) व त्याच्या इतर दोघा साथीदारांनी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पारनेर शहरात एकच खळबळ उडाली. हत्येमागील कारण समजू शकले नाही. विकी खराडे हा सिद्धेश यास वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होता. इन्स्टाग्रामवर मेसेज करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकास पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोकराव शेळके यांनी दिली.
यासंदर्भात नगरसेवक भूषण शेलार यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात विकी खराडे व त्याच्या दोघा साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर पारनेर येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Parner Murder Corporator Cousin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..