
पारनेर : नारायणगव्हाण येथे कॅनॉलच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सदर व्यक्तीचा खून व्यावसायिक वादातून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रदीप प्रभाकर शरणागत यास ताब्यात घेतले आहे.