Supriya Shinde elected unopposed as the Deputy Chairperson of Parner Nagar Panchayat
Sakal
अहिल्यानगर
Parner Nagar Panchayat : सुप्रिया शिंदे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड; राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Sharad Pawar NCP : पारनेर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड होताच राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उसळला. दीपक लंके यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
पारनेर : पारनेर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया सुभाष शिंदे यांची आज(ता. 24) बिनविरोध निवड झाली. अपेक्षेप्रमाणे झालेल्या या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) गटाणे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योग्य न्याय दिला. सुप्रिया यांचे पती सुभाष शिंदे हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी शिंदे परिवाराला या पदाची संधी दिली आहे.

