
पारनेर : पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारातील मुद्देमाल आरोपींनी कारखाना साईटवरुन गायब केल्याची घटना उघड झाली आहे. हा मुद्देमाल अंदाजे सुमारे १५० कोटी रुपये किंमतीचा आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्याच्या मुद्देमालाची चौकशी करण्याकामी कारखाना साईटची तपासी अधिकारी व फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीने पाहणी केली असता हे दिसुन आले आहे.