वाळूचा ट्रक घेऊन येणाऱ्या नायब तहसीलदारांना धकाबुक्की; सात जणांवर गुन्हा

मार्तंड बुचुडे
Saturday, 17 October 2020

ढवळपुरी परिसरातून अनाधिकृत वाळू उपसा करताना अढळून आलेला ट्रक पारनेरचे नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी पकडला.

पारनेर (अहमदनगर) : ढवळपुरी परिसरातून अनाधिकृत वाळू उपसा करताना अढळून आलेला ट्रक पारनेरचे नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी पकडला. तो तहसील कार्यालयात घेऊन येत असताना वाटेत डिसकळ येथे कुलट वस्ती नजीक वैभव पाचारणे यांनी या ट्रकला दुचाकी आडवी लावली व ट्रक थांबविला. 

नायब तहसीलदार माळवे यांना धक्काबुक्की करूऩ गाडीतून खाली उतरविले तसेच साक्षिदार सुनिल भाबड यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी सात जणांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आनल्याप्रकरणी व अनाधिकृत गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या बाबत माहिती अशी की, वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना अनाधिकृतपने वाळु घेऊन जात असताना नायब तहसीलदार माळवे यांनी एक ट्रक पकडला होता. तो पकडल्या नंतर माळवे स्वताः व साक्षीदार भाबड ट्रक मध्ये बसून पारनेर तहसील कार्यालयात घेऊन येत होते. फिर्यादी हे सरकारी काम करीत आहे असे माहीत असतानाही डिकसळ गावा जवळ कुलट वस्ती जवळ आरोपी वैभव पाचारणे याने त्यांच्याकडील दुचाकी ट्रकला आडवी लावून थांबविला. असता आरोपी राजू चंद्रकांत पाचारणे व इतर तिघांना तेथे घेऊन आला व त्यात आरोपी नवनाथ कुटे, प्रीतम कुटे, प्रविण कुटे यांनी येऊन मावळे व भाबड यांना गाडीच्या खाली ओढले व शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

याच वेळी फिर्यादींचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन त्याचे ताब्यातील ट्रक मधील अंदाजे चार ब्रास वाळू रस्त्यावर खाली करून ट्रक घेऊन भाळवणीच्या दिशेने अंधाराचा फायदा घेत पळून गेले. ही घटणा समजताच तहसीलदार ज्योती देवरे स्वताः तेथे गेल्या व त्यांनी एक आरोपी विठ्ठल कुटे यास ताब्यात घेऊन पोलीसांच्या ताब्यात दिले या बाबत वरील सात जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा अनला तसेच अनाकृत गौण खनिज उपसा केल्या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आवा आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Parner taluka Deputy Tahsildar was pushed by sand thieves