

Water Crisis in Parner Ahmednagar Hits 16 Villages and 157 Hamlets as 19 Tankers Supply Water to Over 41000 People
sakal
पारनेर: पारनेर तालुक्यात यंदा पाणीटंचाईचे संकट लवकरच गडद झाले असून, तालुक्यातील १६ गावे आणि १५७ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे ४१ हजार ९१७ नागरिकांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ५५ खेपांमधून नागरिकांची तहान भागवली जात आहे. त्यातच आणखी सहा गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, या गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.