esakal | पार्थ पवार यांची पारनेर भेट...पुढील महिन्यातही येणार, पण कशासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Parth Pawar will do this study in Parner ...

पार्थ पवार यांनी आज (ता. 26 ) अचानक दुपारी पारनेरला येऊन आमदार लंके यांच्या घरी जेवण केले. त्या नंतर लंके यांच्या हंगे गावातील ग्रामदैवत हंगेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.

पार्थ पवार यांची पारनेर भेट...पुढील महिन्यातही येणार, पण कशासाठी...

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या नगर जिल्ह्यात चकरा वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्वितचर्वण सुरू झाले आहे. त्यांचा आजचा पारनेर दौरा तर खासच होता. या दौऱ्याची चर्चाही सुरू आहे.

पार्थ पवार यांनी आज (ता. 26 ) अचानक दुपारी पारनेरला येऊन आमदार लंके यांच्या घरी जेवण केले. कुटुंबातील सदस्यांसोबत आपुलकीने चर्चाही केली. लंके यांच्या आई-वडिलांनी त्यांचा सत्कार केला. त्या नंतर लंके यांच्या हंगे गावातील ग्रामदैवत हंगेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.

हेही वाचा - ही आहे जामखेडकरांसाठी गुड न्यूज

या वेळी आमदार लंके यांची साधी राहणी तसेच साधे घर व घरातील कौटुंबिक प्रेमळ वातावरण पाहून पार्थ आश्चर्यचकीत झाले.

पवार दुपारी आल्यानंतर त्यांनी लंके यांच्या कार्यालयात जाऊन प्रथम कार्यकर्त्यांची ओळखही करून घेतली. त्या नंतर कार्यालयाची पहाणी केली. कार्यालयीन कामकाज कसे चालते, या विषयी सखोल माहिती घेतली. तसेच लंके आमदार म्हणून आपले काम कसे करतात, कार्यकर्त्यांची कामे कशा पद्धतीने करतात, याविषयीही  माहिती घेतली.

आमदार नीलेश लंके यांनी अल्पावधीच कार्यकर्त्यांचे मोठे संघटन केले आहे. त्याचे अनेकांना अप्रूप आहे. साध्या पद्धतीने राहणीबाबत ते परिचित आहेत. पार्थ यांनाही लंके यांचा साधेपणा भावला. जाताना त्यांनी पुन्हा पुढच्या महिन्यात येणार असल्याचेही सांगितलं.

आता उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि पवार कुटुंबातील सदस्य पारनेरमध्ये येतो म्हटल्यावर चर्चा तर होणारच. ते पुढच्या महिन्यात येणार आहेत, नेमके कशासाठी, याचीही चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आंणि आमदार नीलेश लंके यांच्या समर्थकांत आहे. 

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी मी मावळ मतदारसंघात गेलो होतो. त्या वेळी आमचे निकटचे संबध आले आहेत. ते मला भेटण्यासाठी व सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते. शिवाय त्यांनी मी बाहेर जेवण घेणार नाही, घरीच जेवण करू असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही माझ्या घरीच जेवण केले. आमचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यातूनच त्यांनी सदिच्छा भेट दिली.

- नीलेश लंके, आमदार, पारनेर-नगर मतदारसंघ .