

Pathardi Donkey Theft
esakal
पाथर्डी: बाजार समितीच्या आवारात चरण्यासाठी सोडलेली नऊ लाख रुपये किमतीची तब्बल २२ गाढवे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवलेली गाढवे चोरीस गेल्याने पुढे काय करायचे, असा प्रश्न गाढव मालक राजेंद्र पवार व प्रेमनाथ जाधव यांना पडला आहे, तर या गाढवांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.