esakal | महामार्गासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:लाच घेतलं कोंडून; अधिकारी गोंधळले
sakal

बोलून बातमी शोधा

In Pathardi activists have locked the office and agitated for the kalyan visakhapatnam highway

या अनोख्या आंदोलनामुळे महसूल व महामार्ग अधिकारीही गोंधळले. पोलिसांनी खबरदारी म्हणून कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त केला होता.

महामार्गासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:लाच घेतलं कोंडून; अधिकारी गोंधळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी (अहमदनगर) : कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे. रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत महामार्गाच्या कार्यालयातून बाहेर येणार नाही, असा पवित्रा घेत बंडू बोरुडे, देविदास खेडकर, चॉंद मणियार, सीताराम बोरुडे यांनी स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल व महामार्ग अधिकारीही गोंधळले. पोलिसांनी खबरदारी म्हणून कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त केला होता.

सिन्नर-घोटी महामार्गावर गोमांस नेणारा टेम्पो पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
 
गेल्या 6 वर्षांपासून कल्याण-विशाखापट्टणम्‌ राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना अपंगत्व आले. दोन ठेकेदार बदलले. महामार्गाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवला. लोकप्रतिनिधींनी केलेल्या घोषणा हवेत विरल्या. दोन खासदार, दोन आमदार असतानाही गांभीर्याने कामाकडे पाहिले नाही. त्यामुळे वरील कार्यकर्त्यांनी पाथर्डीतील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले. आतून कार्यालयाला कुलूप लावले. शहरातील अनेक व्यापारी, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. कार्यालयाबाहेर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. 

ठेकेदाराला शहरातील कामे सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. आवश्‍यक मशीनरी येणार आहेत. दोन दिवसांत काम सुरू होऊन ते तातडीने पूर्ण करण्यात येईल. शहरातील काम संपल्यानंतर करंजी घाट व इतर ठिकाणची कामे सुरू केली जातील. 
- दिलीप तरडे, प्रभारी उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, पाथर्डी

loading image
go to top