
अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस कंपनीचे गोडावून फोडून भरलेल्या गॅस टाक्यांची चोरी करणारी नऊ आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न केली आहे. टोळीतील एकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून पाच लाख २० हजार रुपयांच्या १३० गॅस टाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.