
नदीवर पूल नसल्याने रस्ता पूर्ण पणे पाण्याखाली जातो. त्यामुधून जीवघेणा प्रवास करून येथील ग्रामस्थ रस्ता पार करतात.वृद्ध, महिला, लहान मुलांनी कसा प्रवास येथून करावा असा सवाल येथील रहिवाशी व्यक्त करीत आहे.
पाथर्डींत तांड्यांचा गावांशी संपर्क तुटला, पावसाने केली ताटातूट
पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील आल्हनवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेला काकडदरा तांड्याचा आल्हनवाडी गावशी संपर्क चार दिवसांपासून तुडला आहे. एक आठवड्यापासून या भागात जास्त पाऊस झाल्याने नदी तुडुंब वाहत आहे.
रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची दळवळणचे साधने बंद झाली आहे. पावसाळ्यात या परिसरात सातत्याने पाऊस होत असल्याने काकडदरा तांडा, खरात वस्ती ,मेरड वस्ती, शेख वस्ती येथील लोकांना नियमित याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील आश्रम शाळेपासून या भागाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता असून नदी पात्र आहे. त्याठिकाणाहून जाण्यासाठीचा मार्ग आहे.
नदीवर पूल नसल्याने रस्ता पूर्ण पणे पाण्याखाली जातो. त्यामुधून जीवघेणा प्रवास करून येथील ग्रामस्थ रस्ता पार करतात.वृद्ध, महिला, लहान मुलांनी कसा प्रवास येथून करावा असा सवाल येथील रहिवाशी व्यक्त करीत आहे.
हेही वाचा - मंत्री थोरात म्हणतात, कोरोनाचा तिसरा प्रहर सुरू झालाय
सुमारे शंभर कुटुंब या ठिकाणी असून सातशे ते आठशे लोक येथे राहतात. सर्वांचा हा गावात येण्यासाठीचा मुख्य दळवळणाचा मार्ग आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला जायला रस्ता नाही. येथील लोकांना सर्वच गोष्टीपासून वंचित ठेवले जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्ग वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये कसे जायचे. पावसाने तांड्याकडे जाण्यासाठीचा रस्ता पाच दिवसापासून बंद झाला आहे.
आमच्याकडे कोणाचाचे लक्ष नाही. डोंगर दर्याला वेढ्या मारून जंगलातून पर्याय रस्त्याने पायी ये-जा करावी लागत आहे. रस्तावर सर्वत्र चिखल साचला आहे. पक्का रस्ता द्या. अन्यथा आमच्याकडे मते मागणीसाठी येऊ नया अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रसंगी सुदाम राठोड, संतोष पवार, राधाकिसन कर्डिले, आगाम गव्हाणे, सुखदेव कर्डीले, अंकुश पवार, विक्रम पवार, राजेंद्र जाधव, रवींद्र पवार, पोपट पवार, सचिन गोवर्धन पवार, संतोष पवार, नितीन पवार आदी उपस्थिती होते.
माजी सरपंच राधाकिसन कर्डीले, परमेश्वर गव्हाणे,अनिल गव्हाणे यांनी जे सी बी च्या साहाय्याने तापुरता भराव टाकून रस्ता चालू करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र कायमस्वरूपी पूल होण्याची गरज आहे. चौकट -माणिकदौंडी परिसरात पाऊस झाल्यामुळे नदी, ओढे, बंधारे, तलाव भरून वाहत आहे.
काकडदरा तांड्याकडे जाण्यासाठीचा जुना कच्चा रस्ता तो नदीतून जातो. येथील नदी पात्रा पूर्ण पाण्याने भरून वाहत असल्याने लोकांच्या दळवळनाचा हा मार्ग परिणामी बंद झाला आहे. आल्हनवाडी ग्रामपंचायत प्रशासक प्रशांत तोरवणे यांनी या ठिकाणी तातडीने भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
संपादन - अशोक निंबाळकर
Web Title: Pathardi Tandya Lost Contact Villages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..