esakal | पत्रकारांनो लायकीत रहा, मी मॅडमपर्यंत हप्ते देतो...अधिकाऱ्या्च्या फेसबुकवरील मजकुराने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Pathardi tehsildar's Facebook account hacked

पाथर्डीचे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्या फेसबुक अकाऊंड हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या महसूल व पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पत्रकारांनो लायकीत रहा, मी मॅडमपर्यंत हप्ते देतो...अधिकाऱ्या्च्या फेसबुकवरील मजकुराने खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : सर्वसामान्य लोकांचे रोज बँक अकाउंट अथवा फेसबुक अकाउंट हॅक होते. त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. परंतु पाथर्डी तालुक्यात अजबच प्रकार घडला आहे. दस्तुरखुद्द नायब तहसीलदारांचेच अकाउंट हॅक झाले आहे. त्यात बराच वादग्रस्त मजकूर आहे, तो पत्रकारांविषयी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पाथर्डीचे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्या फेसबुक अकाऊंड हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - कर्ज घेता का कर्ज, पतसंस्थांकडे कोणी येईना

नेवसे हे वाळु तस्कराकडुन हप्ते मागत असल्याचा उल्लेखही वादग्रस्त मजकुरात आहे. शिवाय मी मँडमपर्यंत हप्ते देतो म्हणजे ह्या मँडम नेमक्या कोण ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना पुणे येथील एका मित्राचा फोन आला व तुमच्या फेसबुक अकाऊंटवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्याचे सांगितले. त्यानंतर नेवसे यांनी फेसबुक अकाऊंड पाहीले असता त्यांना खालील प्रमाणे पोस्ट व्हायरल कुणीतरी केल्याचे समजले व आपले अकाऊंड हँक झाल्याची खात्री झाली.

नेवसे यांनी गुरुवारी रात्री अज्ञात आरोपीने फेसबुक अकाऊंड हँक केल्याची तक्रार पोलिसात नोंदविली आहे. ती वादग्रस्त पोस्ट अशी

असा आहे मजकूर

‘पत्रकारांनो तुमच्या लायकीमध्ये रहा, तुमच्या बापाच्या गाड्या वाळूतस्करी करतात, तेव्हा कोणत्या बिळामध्ये घुसून बसता तुम्ही, माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत. मी वाळूतस्करी करतो, तर काही गुंड वडारी लोकांना सांगता. तुम्ही का मला त्रास द्यावयाचा, तुम्ही पण जास्त उडू नका, सर्व धंदे बंद करेल. मी पण नायब तहसीलदार आहे. बेट्यांनो मी जर तुम्हांला त्रास दिला ना तुमचे कुत्रे हाल खाणार नाहीत. हफ्ते द्या, मग विचार करेल, मी स्वतः मॅडमपर्यंत हप्ते देतो, समजले का... दम बाजी कराल तर याद राखा.’

अशा मजकुराची एक पोस्ट आढळून आली. यामुळे पाथर्डीत फेसबुक अकाऊंड हॅक करणारी काही तज्ज्ञ मंडळी असल्याचे उघड झाले आहे. याचा तपास होवुन संबधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

loading image
go to top