कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील जावई-नातू सिव्हिलमधून पळाले, प्रशासनाची पळापळ

सुनील गर्जे
सोमवार, 25 मे 2020

आज सकाळी हे पिता-पुत्र घशातील स्त्राव नमुने न देताच जिल्हा रुग्णायातून पलायन केले. वडील थेट गावात आल्याने हा प्रकार उघडकीस झाला. यामुळे नेवासे प्रशासनासह बुद्रुक ग्रामस्थांत एकाच खळबळ उडाली. 

नेवासे : कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्याने घशातील स्राव नमुने घेण्यासाठी दाखल केलेल्या नेवासे बुद्रुक येथील पिता-पुत्राने जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. वडील घरी आल्याने उघड झाला. मात्र त्यांच्या मनोरुग्ण मुलाचा रात्री उशिरापर्यंत कोणताही ठाव ठिकाण न लागल्याने नेवासे प्रशासनाचा मोठा गोंधळ उडाला आहे. 

कल्याणहुन नेवासे बुद्रुक येथील आपल्या मुलीला भेटायला आलेली साठवर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांसह एकूण सात जणांना तालुका प्रशासनाने घशातली स्राव नमुने घेण्यासाठी नगर येथे जिल्हा रुग्णालयात रविवार (ता. २४) रोजी सायंकाळी दाखल केले होते. या सात जणांमध्ये त्या महिलेचा नेवासे बुद्रुक येथील जावई व मनोरुग्ण नातवाचा समावेश होता. मात्र, आज सकाळी हे पिता-पुत्र घशातील स्त्राव नमुने न देताच जिल्हा रुग्णायातून पलायन केले. वडील थेट गावात आल्याने हा प्रकार उघडकीस झाला. यामुळे नेवासे प्रशासनासह बुद्रुक ग्रामस्थांत एकाच खळबळ उडाली. 

हेही वाचा - स्वतः बाधित असतानाही मंत्री चव्हाण यांना नगरकरांची काळजी

दरम्यान तालुका प्रशासनाने या पंचावन्न वर्षीय पित्याला ताब्यात घेऊन नेवासे फाटा परिसरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केले. मात्र, मनोरुग्ण असलेला त्यांचा पंचवीस वर्षीय मुलाचा रात्री उशिरापर्यंत तालुका प्रशासनाला कोणताच ठावठिकाणा लागला नव्हता. गायब असलेला हा मुलगा आता कोणकोणाच्या संपर्कात येतो. या विचाराने प्रशासन चक्रावले आहे. 

रविवारीच या सातजणांना जिल्हा रुग्णालयात घेऊन निघाले होते. तेव्हा या मुलाने सर्वांची नजर चुकवून पलायन केले होते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला जवळच असलेल्या स्मशानभूमीत पाठलाग करून पकडले होते. असे असतांनाच त्याने पित्यासह जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्याने जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर अाला आहे.  
 

"या दोघा पिता-पुत्रांना रविवारी घशातील स्राव नमुने घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, हे पिता-पुत्र हे नमुने न देताच आज  रुग्णालयातून पळून गेले. वडील नेवासे बुद्रुक येथे आले. त्यांना विलगीकर कक्षात ठेवले आहे. मात्र, त्यांचा मुलगा अजून मिळून आला नाही.  
- डॉ. अभिराज सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी, नेवासे तालुका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The patient escaped from the district hospital