esakal | कर्जत पंचायत समितीसाठी पवारांनी आणले चार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

Pawar brought Rs 4 crore for Karjat Panchayat Samiti

सध्या आरोग्य विभाग व महिला- बालकल्याण विभागाचे कामकाज जुन्या पंचायत समितीतूनच चालते. त्यांना हक्काचे कार्यालय मिळेल.

कर्जत पंचायत समितीसाठी पवारांनी आणले चार कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत : येथील पंचायत समितीच्या बांधकामासाठी तीन कोटी 88 लाख 60 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. 

येथील पंचायत समितीच्या तळमजल्याचे बांधकाम केले आहे. तेथील वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच इमारतीत सुरू आहेत. मात्र, पंचायत समितीच्या कामाचा आणि विविध विभागांचा आवाका पाहता, सध्या कार्यान्वित असलेली जागा अपुरी आहे.

सध्या आरोग्य विभाग व महिला- बालकल्याण विभागाचे कामकाज जुन्या पंचायत समितीतूनच चालते. त्यांना हक्काचे कार्यालय मिळेल. आता या मजल्याचे बांधकाम मूळ तळमजल्याच्या इमारतीवर होणार आहे.

बांधकामात ग्रीन संकल्पना, नैसर्गिक प्रकाशयोजना, पाणी आणि ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्यजल पुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधनसामग्रीचा वापर होणार आहे. पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे 698.90 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित आहे.

प्रशासकीय कार्यालयांचा पवार यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने होत असलेला कायापालट नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी फायद्याचा ठरत आहे. 
 

सर्व कामे एकाच छताखाली व्हावीत. पंचायत समितीची तळमजला इमारत नजीकच्या काळात झाली असली, तरी ती पावसाळ्यात गळते. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. पहिल्या मजल्याच्या नियोजनात आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबी समाविष्ट करून घेण्यात येतील. 
- रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड 
 

loading image