‘एफआरपी’चे थकीत ६४ लाख द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pay farmers Rs 64 lakh for FRP Nagwade Co-operative factory ahmednagar

एफआरपी’चे थकीत ६४ लाख द्या!

श्रीगोंदे : शेतकऱ्यांचे ''एफआरपी''चे थकीत असणारे प्रतिटन ९ रुपये ०८ पैसे या प्रमाणे ६३ लाख ७९ हजार देण्याचे निर्देश प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्याला दिले. सभासदाच्या पाठपुराव्याने हे आदेश झाले आहेत. कारखान्याचे सभासद भाऊसाहेब पवार यांच्या अर्जावरील सुनावणी दरम्यान हे निर्देश देण्यात आले. २०२०-२१ या गाळप हंगामातील नागवडे कारखान्याची एफआरपी प्रतिटन दोन हजार ६६१.२० रुपये प्रतिटन जाहीर करण्यात आली होती.

परंतु त्यापूर्वीच म्हणजे २०१९-२० यावर्षी कारखान्याचा गाळप हंगाम बंद राहिल्याने एफआरपीची रक्कम कमी करून प्रतिटन दोन ४५३.४८ रुपये इतकी करण्यात आली होती. प्रतिटन दोन ४४४.४० रुपये शेतकऱ्यांना दिली होती. परिणामी उर्वरित प्रतिटन ९ रुपये ८ पैसे याप्रमाणे ६३ लाख ७९ हजार रुपये थकीत होते. ही बाब पवार यांनी निदर्शनास आणून देत तसे म्हणणे मांडले. त्यावर सुनावणी होऊन सदर रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे निर्देश प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी दिले.

एफआरपीपोटी प्रतिटन २१७ रुपयांप्रमाणे व्याजासह रक्कम मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या साधेपणाचा अधिकारी आणि कारखानदार फायदा घेत असून प्रादेशिक सहसंचालकांच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका लवकरच दाखल करणार आहोत.

- भाऊसाहेब पवार, वांगदरी, तक्रारदार.

Web Title: Pay Farmers Rs 64 Lakh For Frp Nagwade Co Operative Factory Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top