

Akole Pendhshet Students Protest Over Teacher Shortage Demand Immediate Appointment of Regular Teachers in Primary School
sakal
अकोले : ‘आमच्या शाळेला गुरुजी द्या’, ‘आम्हाला शिकायचंय, आम्हाला शिक्षक द्या’, ‘गुरुजी नाहीत, मग शाळा कशाला?’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन पेंडशेत येथील चिमुकले विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रथम सत्रापासून शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी शांततापूर्ण मोर्चा काढला.