esakal | कार, पिकअप अन्‌ दुचाकीचा विचित्र अपघात; बाराजण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Pickup and car accident near Gondegaon on Shrirampur Puntamba road

श्रीरामपूर- पुणतांबा रस्त्यावर गोंडेगाव येथील गवळीबाबा फाटा परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला.

कार, पिकअप अन्‌ दुचाकीचा विचित्र अपघात; बाराजण जखमी

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर- पुणतांबा रस्त्यावर गोंडेगाव येथील गवळीबाबा फाटा परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला. त्यात चार बालकांसह १२ प्रवाशी जखमी झाले आहेत. मालवाहु पिकअप, कार व दुचाकी असे तीन वाहने ऐकमेंकामवर आदळुन हा अपघात झाला. 

जखमींना येथील कामगार रुग्णालयासह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस शिपाई सतिश गोरे यांनी घटनास्थळी पहाणी करुन पंचनामा केला.

श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे जाणाऱ्या कारला धुळ्याहुन श्रीरामपूरकडे येत असलेल्या पिअपची जोराची धडक बसली. धडकेची तीव्रता अधिक असल्याने कारने यूटर्न घेऊन मागे असलेल्या दुचाकीला धडकली. त्यामुळे दुचाकी चालकासह दोन महिला जखमी झाल्या. कारमधील बालकांसह सात प्रवाशी जखमी झाले. तर पिकचालकही मार लागल्याचे समजते. 

अपघात घडल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या चार बालकांसह १२ प्रवशांना कामगार रुग्णालयासह येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविल्याचे पोलिसांनी सांगितले.
विचित्र अपघात घडल्याने कारसह पिकअपचे नुकसान झाले असुन दोन्ही वाहने रस्त्याच्याखाली उतरली होती. पोलिसांनी चौकशीनंतर कारसह दुचाकी क्रेनच्या साह्याने पोलिस ठाण्यात आणली असुन सांयकाळी उशीरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

तालुका पोलिस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची माहिती घेत असुन कारमधील प्रवाशी नेवासा व दुचाकीस्वार निभांरी (ता.नेवासा) तर पिकअपचा चालक धुळे जिल्ह्यातील असल्याचे समजते. सदर महिंद्रा पिकअप धुळे येथुन नियमित श्रीरामपूरात शेंगदाण्याचे पोते भरुन येत असल्याचे सांगितले जाते.

संपादन : अशोक मुरुमकर