esakal | पाथर्डी- मिरी- तिसगाव रस्त्यावर खड्डे 
sakal

बोलून बातमी शोधा

Pits on roads in Pathardi taluka

साडेतीन महीन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील रस्त्यावलर पाणी साचुन खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत.

पाथर्डी- मिरी- तिसगाव रस्त्यावर खड्डे 

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : साडेतीन महीन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील रस्त्यावलर पाणी साचुन खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. अकोला ते मोहोज देवढे रस्ता, मिरी ते तिसगावरस्ता, करोडी ते टाकळीमानुर रस्ता, पाथर्डी ते नगर रस्ता या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. 

तिसगाव- मिरी रस्त्याच्य़ा झालेल्या अवस्थेला बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हा परीषद सदस्य अनिल कराळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तालुक्यात जुनपासुन चांगला पाऊस झाला आहे. आठ दिवसात तर पाऊस रोजच येत आहे. तिसगाव मिरी रस्त्यावर पाणी साचले तेव्हा संबधीत ठेकेदाराला सांगुन पाणी बाजुल काढुन दिले असते. तर रस्ता खचला नसता. रस्त्यावर पडलेले खड्डे दोन फुटापेक्षा जास्त खोलीचे आहेत. 

कोणतेही वाहन रस्त्यावर टेकले जाते. त्यामुळे अनेक अपघात वाढले आहेत. मिरी- करंजी जिल्हा परीषद गटाचे सदस्य अनिल कराळे, शिवाजी मचे, उद्धव दुसंग, दत्तात्रय कोरडे यांच्यासह त्या भागातील सरपंच व काही प्रमुख कार्यकर्ते पाथर्डीच्या सामाजिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आले होते. यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थीत नव्हते. 

केवळ दोन कर्मचारी उपस्थीत होते. कराळे यांनी पाथर्डीच्या उपविभागीय अभियंत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अहमदनगर येथील बपांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना संपर्क साधुन येथील रस्त्यांची अवस्था व कार्यालयाची अवस्था सांगितली. पाथर्डीच्या उपविभागीय अभियंत्यास नोटीस बजावुन खुलासा मागविण्यात येईल असे कराळे यांना नगर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अकोला ते मोहोज देवढे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अकोला ग्रामपंचायतीने केलेल्या पाईपलाईनसाठी रस्ता खोदला तेथे झालेल्या खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत. येथील अभियंता यांना याबाबत सांगुनही काही केलेले नाही. करोडी ते टाकळीमानुर रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. अनेक अपघात घडत आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नेमलेले ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम बपांधकाम विभागाचे अधिकारी करीत असल्याच आरोप कराळे यांनी केला आहे. 

तालुक्यातील रस्त्यावर पावसामुळे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्ते खचले देखील आहेत. मिरी- तिसगाव रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. इतर ठिकाणीही खड्डे बुजविले जातील. पावसामुळे काम करण्यास मर्यादा येत आहेत. पावसाळा जास्त झाल्याने रस्त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
- एम. एच. सकबे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी 

संपादन : अशोक मुरुमकर