कोरोना नियमांची पायमल्ली कराल तर... 

पुरुषोत्तम कुलकर्णी 
Saturday, 25 July 2020

मोटार सायकलवर विना मास्क, डबलसीट, विनाकारण फिरणारांची आता खैर नाही. राहुरी पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे.

राहुरी (अहमदनगर) : मोटार सायकलवर विना मास्क, डबलसीट, विनाकारण फिरणारांची आता खैर नाही. राहुरी पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. तब्बल 31 जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणारांना प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले. सार्वजनिक ठिकाणी फिरतांना तोंडाला मास्क लावणे, मोटार सायकल वरुन प्रवास करण्यास एकाच व्यक्तीला परवानगी आहे. विनाकारण घराबाहेर फिरु नये, गर्दी करु नये, अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अशा सक्त सूचना आदेशात देण्यात आलेल्या आहे. परंतु, त्याकडे दूर्लक्ष करुन, नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाने सुरुवातीला प्रबोधन केले. नंतर, पोलिसांच्या लाठीचे फटके दिले. तरी, त्यामध्ये फारशी सुधारणा दिसत नाही. 

विना मास्क, विना कारण, मोटार सायकलवर डबलसीट फिरणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्‍यात कोरोनाची बाधितांची संख्या वाढू लागली आहे. राहुरी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. राहुरी शहरासह ग्रामीण भागात रस्त्यावरुन विनाकारण फिरणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action against 31 persons without masks in Rahuri