
अहिल्यानगर : जिल्ह्यातील गोमांस विक्री व कत्तलखान्यांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे संकेत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यातील पाच अवैध कत्तलखान्यांवर छापे टाकून १७ जनावरांसह ३०० किलो गोमांस ताब्यात घेत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.