esakal | कर्जतमधील दारूअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त

बोलून बातमी शोधा

crime logo
कर्जतमधील दारूअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त
sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत पोलिसांनी दारूअड्ड्यांवर छापे घालून एक लाख 55 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अकरा दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सध्या सर्वत्र "लॉकडाउन' आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवत काही गावांत अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथके तयार करून आज विविध गावांतील दारूअड्ड्यांवर छापे घातले, तसेच जाफर बंडू शेख (रा. बेलवंडी, ता. कर्जत), महादेव लक्ष्मण नवले (रा. चांदे, ता. कर्जत), किरण रघुनाथ गंगावणे (रा. चांदे, ता. कर्जत), भरत चंद्रकांत घालमे (रा. शिंदे, ता. कर्जत), जयश्री हनुमंत पवार (रा. कर्जत), राजेंद्र विश्‍वनाथ भोसले (रा. टाकळी खंडेश्‍वरी, ता. कर्जत), इस्माईल शब्बीर पठाण (रा. टाकळी खंडेश्‍वरी, ता. कर्जत),

शालन सोनबा शिंदे (रा. जलालपूर, ता. कर्जत), आकाश सुनील मांडगे (रा. रेहेकुरी, ता. कर्जत), महेश अरुण गोडसे (रा. जोगेश्‍वरवाडी, ता. कर्जत) व गंगाराम सर्जेराव आडगळे (रा. रवळगाव, ता. कर्जत) या अकरा जणांवर गुन्हे दाखल केले. या छाप्यात एक लाख 55 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारूधंद्याची माहिती कळवा

तालुक्‍यात अवैध दारूविक्री होत असेल, तर पोलिस ठाण्यास किंवा मला फोन करा; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत पोलिस ठाणे