

Shrirampur Crime:
श्रीरामपूर : तळेगाव दाभाडे (पिंपरी चिंचवड आयुक्तालय, जि. पुणे) पोलिस ठाण्याचे पथक श्रीरामपूरमध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी आले असता, त्यांच्यावर ३० ते ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केली. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास इराणी गल्ली (वॉर्ड नं. १) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर कोयत्याचा वार झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षकाने स्वसंरक्षणार्थ शासकीय पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. या धाडसी कारवाईनंतर मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले.